काल २ ऑक्टोबर गाँधी जयंती....
एक ३० जानेवारी आणि २ ऑक्टोबर हे दिवस आता फक्त दिवस साजरे करण्यापुरते उरलेत, आपल्या देशात गाँधीजी सारखे महान व्यक्तिमत्व झाले हे आपल्या देशा सौभाग्य. पण आपल्या देशातच जेवढा बापुंचा, त्यांचा विचारांचा जेव्हढा अपमान होतो तेव्हढा जगात दुसरीकडे कुठे होत नसेल, हेच आपले दुर्भाग्य आहे.
आपले राजकारणी सुद्धा या दिवशी फक्त राजघाट ह्या गाँधीजीच्या समाधी ठिकाणी जाऊंन फक्त फुले वहाणे एवढेच काम करतात. सत्य, अहिंसा, हे गुण ह्या देशाच्या ९९ टक्के नेत्यां मधे कुठे दिसत नाहीत.
अजुनही गाँधीजी चे विचार कालबाह्य झाले नाहीत, उलट ह्या देशाला नव्हे संपूर्ण जगाला सध्या सत्य , अहिंसा ह्या विचारांचे महत्व पटू लागले आहे.
ज्या भारतामधे बापुंचा जन्म झाला त्या माझ्या भारत देशात सध्या अराजक पसरले आहे, नक्षलवाद, प्रांतवाद, धर्मा धर्मा मधील विवाद, अयोध्या बाबरी मस्जिद सारखे वाद, इत्यादि प्रश्न सध्या देशाला भेडसावत आहेत.
गांधीजी त्यांचा विचारांची खिल्ली उड़वणे सध्या एक फैशन झाली आहे. कोणी ही उठतो आणि त्यांच्या विषयी काहीही बोलतो.
आज जो आपण शहरातील झगमगाट बघतो त्यालाच आपण आपल्या देशाची भारताची प्रगति समजुन बसलोय, आजही देशाच्या लोकसंख्येच्या ७२.१० टक्के लोक खेड्यात रहातात. त्याना अजुनही दिवसाचे २० रुपये ही कमावणे मुश्किल आहे. करोडोची लोकसंख्या एक वेळ उपाशीपोटी रहते, २०१० साली हे उपासमारीने कित्येक लोकांचा जीव जातो आणि सरकार ह्या गोष्टी जनते समोर येऊ नयेत म्हणून दाबुन टाकायचा प्रयत्न करते.
बापुनी जेव्हा संपूर्ण देशात प्रवास केला तेव्हा त्याना जाणीव झाली की ह्या देशात किती गरीबी आहे, म्हणून त्यानी साधे जीवन मान स्वीकारले, त्यानी फक्त पंचा आणि धोतर ह्यांचा आयुष्य भर वापर केला, त्यावरच ते परिषदे साठी इंग्लैंड ला गेले.
आज शहरामधे खुप अन्न फुकट घालवले जाते, खुप पैसा चैन करण्या वर घालवला जातो पण आपल्याला कधी असा विचार मनात येत नाही की, असे लोक ही ह्या देशात आहेत ज्याना पोटभर जेवण, अंगभर कपडे, रहायला घर मिळत नाही, त्यांच्यासाठी अपन काय करतो आपल्याकडे चित्रपट बघायला, दारू, पार्ट्या करायला वेळ आणि पैसा असतो पण गरीब मुले आणि वृद्ध लोक ह्यांच्या साठी पैसा अणि वेळ नसतो.
मी इथे एक आवाहन करू इछितो, ज्याना शक्य आहे त्यानी गरीब मुले व वृद्ध ह्याना वेळ दया किवा त्याना मदत करणारया चांगल्या संस्थान मदत करा.
मला इथे एक बापुंचे अवडते भजनाच्या ओळी आठवतात.......
वैष्णव जन तो तेने कहिये जे पीड पराई जाणे रे,पर दु:खे उपकार करे तोये मन अभिमान न आणे रे,
visit at http://www.mkgandhi.org/ अनंतफंदी



0 comments:
Post a Comment